Home क्राईम खबर  मागील तीन महीन्यात ब्रम्हपुरी पोलींसांकडून सतत प्रभावी अवैध्य दारू विक्री वर कारवाया..

मागील तीन महीन्यात ब्रम्हपुरी पोलींसांकडून सतत प्रभावी अवैध्य दारू विक्री वर कारवाया..

309

🔺अवैध दारू वाहतुक करणाऱ्या माफियांना ब्रम्हपुरी पोलिसांचा दणका

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.2ऑक्टोबर):-दि. ०१/१०/२१ रोजी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत अवैध दारू वाहतुकीच्या तीन केसेस करण्यात आल्या असून त्यातील दोन केसेस हया ब्रम्हपुरी टाउन मध्ये तर एक केस ही ग्राम मेंडकी येथे करण्यात आलेली आहे. केली गेलेली कारवाई करण्यात आली.आरोपी क्रीष्णा सुनिल करंबे वय २४ वर्ष रा झाशी राणी चौक कुर्झा ता ब्रम्हपुरी हा त्यांचेकडील अॅक्टीवा मो.सा क MH 49.1589 वरून एका चुंगळीमध्ये रॉकेट देशी दारू मंत्रा कंपनीची देशी दारूचे ०५ बॉक्स अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला नमूद आरोपीकडून १,००,०००रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी चेतन केवळराम सहारे वय २१ वर्ष रा हनुमान चौक नांदगाव जाणी ता. ब्रम्हपुरी हा त्यांचेकडील बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक MH 34 AF 8254 वरून एका चुंगळीमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीची देशी दारू चे ०४ बॉक्स अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला. नमूद आरोपीकडून ९०,०००रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ग्राम मेंडकी येथे आरोपी अवरसिंग बच्चनसिंग दुधानी वय ३५ वर्ष रा. कपाळामेंढा हा त्याचे मोटरसायकल क्रमांक MH 34 BA 6327 वरून अवैध दारूसाठा वाहतुक करतांना मिळून आला. त्याचे ताब्यातून मोटरसायकलसह अवैध दारू असा एकूण ३०,६०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नमूद तीन्ही कारवायांमधील आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून दि. ०१/१०/२१ रोजी केल्या गेलेल्या तीन्ही केसेस मधून वाहतुक करण्यासाठी वापरलेल्या तीन मोटरसायकल सह अवैध दारू असा एकूण २,२०,६०० रू (दोन लाख वीस हजार सहाशे ) रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

अवैध दारू विक्री व वाहतुकीवर आळा घालण्यासंबंधाने ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनतर्फे विशेष मोहीम सुरू असून चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी उठल्यानंतरही ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामीण परीसरात तसेच ब्रम्हपूरी येथून गडचिरोली जिल्हयामध्ये लपूनछपून अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहीती समोर येत असल्याने पो.स्टे ब्रम्हपुरी पोलीसांकडून सतत छापेमारी कारवाई करणे सुरू आहे. मागील तीन महीन्यात ब्रम्हपुरी पोलींसांकडून सतत प्रभावी कारवाया करण्यात आलेल्या आहेत. आगामी नवरात्र उत्सव तसेच इतर सण उत्सवाच्या अनुषंगाने पो स्टे ब्रम्हपुरी कडून आणखी प्रभावी कारवाया करण्याची तजवीज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here