Home महाराष्ट्र मोफत घरपोच ७/१२ महाविकास आघाडी सरकारचा लोकाभिमुख निर्णय: तातूभाऊ देशमुख

मोफत घरपोच ७/१२ महाविकास आघाडी सरकारचा लोकाभिमुख निर्णय: तातूभाऊ देशमुख

92

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी प्रतिनिधी)

उमरखेड(दि.ऑक्टोबर):- डिजिटल सातबारा मुळे कामकाजात अचूकता येईल असे प्रतिपादन तातूभाऊ देशमुख काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उमरखेड तालुक्यातील धनज येथे डिजिटल स्वाक्षरीत सातबारा वाटपाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते .यावेळी तहसीलदार आनंद देऊळगावकर ,नायब तहसीलदार वैभव पवार ,नायब तहसीलदार काशिनाथ डांगे ,प्रज्ञानंद खडसे पंचायत समिती सभापती उमरखेड, सुमित्राताई गोपीचंद दोडके पंचायत समिती सदस्य ,सविताताई चितंगराव कदम माजी जिल्हा परिषद सदस्य, यु.यु.जुबंडे मंडळ अधिकारी मुळावा , तलाठी पि.पि. सानप तलाठी जी .एस. मोळके, बि.डि.भांगे ग्रामसेवक ,सरपंच वनिता देवानंद पाचपुते ,संतोष जाधव , बापुराव धनवे पोलीस पाटील अनाजी बोबंले तंटामुक्ती अध्यक्ष मंचावर उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरीत सातबारा वाटपाचा कार्यक्रमाच्या सुरुवात होत आहे हा एक चांगला उपक्रम असून त्यामुळे कामात अचूकता आणि गतिमानता येईल सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात यावे लागणार नाही त्यांच्या वेळेत आणि खर्चात बचत होईल महसूल विभागाने 50 वर्षानंतर सातबारा उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीत बदल केला आहे महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे यावेळी तातू भाऊ देशमुख यांनी आपले विचार मांडले. तातू भाऊ देशमुख यांच्या हस्ते उमरखेड तालुक्यातील धनज येथील विस खातेदारांना प्रातिनिधिक स्वरूपात सुधारित मोफत डिजिटल सातबाराचे वाटप करण्यात आले.

तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी नव्या उपक्रमाची माहिती दिली देऊळगावकर साहेब म्हणाले नागरिकांना सहज व तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे. नागरिकांना नवीन स्वरूपात संगणक सातबारा उपलब्ध करून देण्यात आला आहे आता सातबारा नव्या स्वरूपात पाहायला मिळेल महसूल विभागाच्यावतीने सातबारा सोबत आठ होल्डिंग ई-फेरफार सुद्धा संगणकीकृत पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला सात बारा नियमितपणे काढून पाहायला पाहिजे काही त्रुटी आसल्यास तलाठी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.
प्रज्ञानंद खडसे पंचायत समिती सभापती उमरखेड म्हणाले शेतीशी निगडीत सातबारा हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे प्रशासनाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे त्याचाच भाग म्हणून सुधारित सातबारा उपलब्ध करून देण्यात येत आहे .कार्यक्रमाचे प्रास्ताविक चरन डोंगरे यांनी प्रशासनाने पाणंद रस्ता धनज ते धनज तलाव करण्यासाठी पाठपुरावा करावा आसे सांगितले.

सूत्रसंचालन डी .एन. कांबळे सर तर आभार प्रदर्शन देवानंद पाचपुते यांनी केले. कार्यक्रमाला गावातील उपसरपंच मुक्ता संजय झाटे प्रवीण वाळले ग्रामपंचायत सदस्य गौतम ढोबळे दत्तप्रसाद जाधव महानंदा चरण डोंगरे माजी सरपंच रेश्मा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य साहेबराव राठोड दत्तप्रसाद जाधव नासर देशमुख प्रकाश आमले राजाराम वाळके बि.वाय.पोफाळकर सर व तयब अली कृषी मित्र मुळावा काशिनाथ डाखोरे कृषी मित्र मोहदरी व गावातील शेतकरी राणोजी मोडक शेख मुस्तफा शेख चाँद शेख मन्सूर शेख रहिम बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आडद यथील सरपंच विठ्ठल ठाकरे व शेतकरी आणि मोहदरी यथील कपील डाखोरे शंकर कोरडे संतोष कुबडे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here