



✒️मनोज नगरनाईक(विशेष प्रतिनिधी)
खामगाव(दि.2ऑक्टोबर):- खामगाव ग्रामिण ग्रामपंचायतीच्या वतिने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त खामगाव ग्रामीण येथे दिव्यांग लाभार्थी यांना संसारपयोगी वस्तूंच्या किट चे वाटप करुन गांधी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंचा पुष्पाताई निंबाळकर तर प्रमुख अतिथी विराट दिव्यांग फाऊन्डेशनचे अध्यक्ष श्री मनोज नगरनाईक होते यावेळी श्रीनगरनाईक यांनी उपस्थित दिव्यांग लाभार्थी यांना विविध शासकिय योजनांची व हक्कांची सविस्तर माहिती दिली तसेच सरपंच यांनी लवकर ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग बंधु भगिनींचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येईल असे प्रतिपादन केले.
यावेळी शेख हातम दुलु उपसरपंच, नागोराव वाघ ग्रामपंचायत सदस्य लिशान बी नुर खान ग्रामपंचायत सदस्या गजानन सोळंके ग्रामसेवक शमशेरसिंग सोळंके, रविंद्र चव्हाण,अजय उपरवट कर्मचारी सतिश निंबाळकर,तर दिव्यांग शक्तीचे एम के पाटिल,रमेश बारगीर,बगाडे व दिव्यांग बांधव भगिनी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावकरींच्यावतिने सौ खत्रीताई व श्री जोशी यांनी ग्रामपंचायत करित असलेल्या विविध योजनांची अंमलबजाणी च्या कामाचे कौतीक त्यांनी केले.





