Home महाराष्ट्र आष्टी येथे ” आजादी का अमृत महोत्सवास ” सुरवात त्या निमित्त प्रभात...

आष्टी येथे ” आजादी का अमृत महोत्सवास ” सुरवात त्या निमित्त प्रभात फेरी संपन्न

256

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.2ऑक्टोबर):-महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण,मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांचे निर्देशान्ववे, तालुका विधी सेवा समिती आष्टी,वकील संघ आष्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.२आँक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ९ – ३० वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय आष्टीचे प्रांगणात ” आजादी का अमृत महोत्सव ” या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन मा.के.के.माने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आष्टी तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी व मा.व्ही.एन.शिंपी सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी तसेच एस.एस.मुंडे गटविकास अधिकारी पंचायत समिती आष्टी, अँड.एम.एस.तांदळे अध्यक्ष वकील संघ आष्टी,विधिज्ञ संघांचे सन्मानीय सदस्य यांचे हस्ते करण्यात आले.

त्यानंतर दिवाणी व फौजदारी न्यायालय आष्टीचे प्रांगणातुन प्रभात फेरीस सुरुवात करण्यात आली.आण्णा भाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज,कमानवेस मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महात्मा ज्योतिबा फुले चौक,महावीर चौक मार्गे दिवाणी व फौजदारी न्यायालय आष्टीचे प्रांगणात समारोप करण्यात आला.मा.के.के.माने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आष्टी तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी यांनी उपस्थित महिलांना महिला विषयी असणारे कायदे व कोरोनामुळे अनाथ मुले,एकल,विधवा महिला यांचे विषयी राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजना विषयी माहिती देवून यांना पॉस्को कायदा व तालुका विधी सेवा समिती आपल्यासाठी काय कार्य करते यांची माहिती दिली.पुढे बोलताना म्हणाले कि,आज पासून आझादी का अमृत महोत्सवास सुरुवात झाली असून हा कार्यक्रम १४ नोव्हेबर पर्यंत घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.

तसेच अँड.बी.एम.झांबरे यांनी महिलांचे अधिकार व कायदा तसेच महिलांना शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजना विषयी सखोल मार्गदर्शन केले.आजादी का अमृत महोत्सवच्या प्रभात फेरी मध्ये अंगणवाडी सेविका,नागरपंचायत कर्मचारी,पंचायत समिती कर्मचारी,न्यायालयीन कर्मचारी,वकील संघ आष्टी तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अँड.अजय जोशी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here