Home महाराष्ट्र पिंप्री खु. येथिल आदर्श प्राथमिक शाळेत म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन..

पिंप्री खु. येथिल आदर्श प्राथमिक शाळेत म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन..

260

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगाव-पिंप्री खु(दि.2ऑक्टोबर):-येथील आदर्श प्राथमिक शाळेत म.गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोघांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांती यांचा आयुष्यभर प्रचार केला व स्वत:ही हीच शिकवण आचरणात आणली. ‘आधी करावे मग सांगावे ‘, असे त्यांचे आचरण होते. त्याचप्रमाणे तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले.

लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. अश्या दोन्ही नेत्यांना वंदन करून स्मरण करण्यात आले.यावेळी आर आर पावरा, एस के शिंदे, आर एस पाटील, एस ए पटेल, सौरभ देसले आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here