Home महाराष्ट्र कोरोनाच्या महामारीत किती जबाबदारीने वागावे हे ख-याअर्थाने प्रदिप पांडूळे व निलीमा थेऊरकर...

कोरोनाच्या महामारीत किती जबाबदारीने वागावे हे ख-याअर्थाने प्रदिप पांडूळे व निलीमा थेऊरकर यांनी दाखवून दिले – माजी आ.साहेबराव दरेकर

413

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.2ऑक्टोबर):-कोरोनाच्या महामारीत महसूल प्रशासनाने किती जबाबदारीने वागावे आणि किती कार्यतत्पर राहवे हे या तालुक्याल्या ख-या अर्थाने कुणी दाखवून दिले असेल तर नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे व नायब तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन माजी आ.साहेबराव दरेकर यांनी केले.आष्टी येथील नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे व नायब तहसिलदार श्रीमती निलीमा थेऊरकर यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांना आष्टी तहसिल कार्यालयाच्या वतीने निरोप संभारंभ देण्यात आला.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर बोलत होते.

याप्रसंगी तहसिलदार राजाभाऊ कदम,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,नायब तहसिलदार श्रीमती शारदा दळवी,नायब तहसिलदार पंढरपुरे,प्रभारी नायब तहसिलदार पांडूरंग माडेकर व सत्कारमुर्तीसह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी आ.दरेकर म्हणाले,तहसिल हे तालुक्याची आई असून,या ठिकाणी आल्यानंतर सामान्य माणसाचे काम नाही झाले तरी चालेल पण आपल्याला कुणीतरी समजून सांगाण्याची जबाबदारी या दोघांनी केली.या दोघांनीही आपल्या अनुभवाचे काम दुस-या ठिकाणी करतीलच पण परत ते दोघे ही आष्टीत नाही पण जिल्ह्यात तरी यावे.मराठवाड्याची माणसे प्रेमळ आहेत पण वेळेला काय होते ते कळत नाही पण आष्टीचे नागरिकही तेवढेच प्रेमळ असल्याचेही माजी आ.साहेबराव दरेकर यांनी सांगीतले.

तहसिलदार राजाभाऊ कदम म्हणाले,बदली हा नोकरी चा अविभाज्य घटक आहे.आज माझ्या सहकार्यांने जे काम केले हे खरेच चांगल्या पध्दतीने केले आहे.मला याठिकाणी येऊन एक वर्ष झाले असले तरी या दोघांच्या सहवासात मला सहकार्य लाभले आहे.तहसिलमध्ये आलेल्या माणसाचे काम होते का? नाही यापेक्षा माझे काय काम आहे हे विचारणारा कुणी तरी तहसिलमध्ये आहे हे काम या दोघा सहकार्यांने केले असल्याचे त्यांनी सांगीतले.माजी जि.प.सदस्य विजय गोल्हार,नायब तहसिलदार शारदा दळवी,नायब तहसिलदार पांडूरंग माडेकर,गटविककास अधिकारी सुधाकर मुंडे,आनंदवाडीचे सरपंच प्रा.राम बोडखे,संजय थोरवे,ग्रामसेवक बाळासाहेब थोरवे,नांदूरचे माजी सरपंच संजय विधाते,सचिन भस्मे,दादा घोडके,शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी,काॅग्रेसचे आष्टी विधानसभा अध्यक्ष रविंद्र ढोबळे,ॲड.बाळासाहेब झांबरे,प्रफुल्ल सहस्ञबुद्दे यांच्यासह आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन आदर्श शिक्षक राजेंद्र लाड यांनी केले तर आभार पांडूरंग माढेकर यांनी मानले.
———————————————-
आष्टीचे प्रेम कधी विसरणार नाही

गेल्या साडेचारवर्षात मला आष्टीमध्ये नायब तहसिलदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.या साडेचार वर्षात मला निवडणुकीसह इतर सर्वच विषयाची अनुभवाची शिदोरी मिळाली आहे.त्याचा उपयोग मी भविष्यकाळासाठी होईल आणि आष्टीकरांचे काम कधीही विसणार नाही.
-निलीमा थेऊरकर,नायब तहसिलदार
———————————————-
मला माझ्याच तालुक्यात काम करण्याचे भाग्य मिळाले

मी मे २०१४ मध्ये बीडला नायब तहसिलदार म्हणून रूजू झालो आणि बीड जिल्ह्यात आष्टी येथीलच नायब तहसिलदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी सात वर्ष मला माझ्याच तालुक्यात काम करण्याचे भाग्य मिळाले.
-प्रदिप पांडूळे,नायब तहसिलदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here