Home महाराष्ट्र प्रभागातील नागरिकांना सर्वाधिक योजनांचा लाभ मिळवुन देणारे नगरसेवक गोपाळ आंधळे- वैजनाथ सोळंके

प्रभागातील नागरिकांना सर्वाधिक योजनांचा लाभ मिळवुन देणारे नगरसेवक गोपाळ आंधळे- वैजनाथ सोळंके

64

✒️अतुल बडे(परळी प्रतिनीधी)

परळी(दि.2ऑक्टोबर):-सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत.या योजनांनाचा लोकप्रतिनिधीकडुन लाभार्थ्यापर्यंत पोंहचविल्या जातात शहरातील प्रभाग पाच मध्ये शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी सर्वच योजना प्रभावीपणे राबवत या योजनांचा फायदा मिळवुन दिल्याने गोपाळ आंधळे यांचे कार्य प्रभावी ठरले असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथ सोळंके यांनी केले.प्रभाग 5 मधील नागरीकांना ई- श्रम कार्डचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व न.प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक पाच मधील असंघटीत क्षेञात काम करणार्या कामगारांची ई-श्रम नोंदणी दि.१५ सप्टेंबर ते ३०सप्टेंबर या कालावधीत जवळपास ७०० मजुरांची नोंदणी  नगरसेवक गोपाळ आंधळे यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आलेल्या कामगारांचे कार्ड शुक्रवार दि. १ऑक्टोबर रोजी जिल्हा  नियोजन समितीचे सदस्य वैजनाथराव सोळंके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना श्री सोळंके म्हणाले की, नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी शासनाच्या ई-श्रम कार्ड बरोबरच, संजय गांधी निराधार योजना मध्ये प्रभागातील २०० नागरीकांना लाभ मिळवून दिला.

तसेच प्रधान मंत्री आवास योजनेतून ४०० लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रभागात कायमस्वरूपी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या साठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. बचत गटाच्या माध्यमातून स्ञी सशक्तीकरण ,कायम स्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून टॅन्करमूक्त प्रभाग केला. कायम सर्व सामान्य मानसाशी नाळ जोडलेला नगरसेवक म्हणून गोपाळ आंधळे यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला आहे.यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे शहर सरचिटणीस बळीराम नागरगोजे, युवा कार्यकर्ते हनुमान आगरकर, सचिन भांडे,पिंन्टू तळेकर , गोपाळ खेञे, आंबादास गायकवाड, आदिंसह प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी मानले.

Previous articleप्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देईपर्यंत लढू – सखाराम बोबडे पडेगावकर
Next articleझरीजामणी ग्रामरोजगार सेवक संघटनेचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here