




✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)
पुणे(दि.2ऑक्टोबर):-शहरातील नाभिक समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक आणि राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे प्रदेश सल्लागार श्री.अरुण कालेकर यांनी आपला वाढ दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे,वाढ दिवसाचे औचित्य म्हणून नऊ ज्येष्ठ विधवा महिला भगिनीना साडी आणि दोन अपंग मुलीना ड्रेस देऊन सन्मानित करण्यात आले.
या छोटेखाणी कार्यक्रमास माजी नायब तहसीलदार
श्री बाळासाहेब भामरे,माजी न्यायाधीश श्री मोहन रावजी क्षीरसागर साहेब , कमांड हॉस्पिटलचे सीनियर ऑफीसर श्री दत्तात्रय गोरे साहेब, कमिंसचे मेनेजर रामदास सैँदाने साहेब,माजी सैनिक, ज्येष्ट एकपात्री नाटककार आणि कॉमेडी कलाकार श्री यादव साहेब, राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्षश्री भगवानराव जी शिंदे साहेब, महिला शहर अध्यक्ष सौ योगीता ताई भालेकर, वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले प्रख्यात डॉक्टर आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री अरविंद जी झेंडे साहेब,माजी बँक व्यवस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवकश्री शंकर रावजी काळे साहेब पुणे शहर अध्यक्ष चंद्रशेखर जगताप,राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे पदाधिकारी श्री दत्ता गोरे आणि मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या.
मान्यवरांनी आपआपले विचार, समाजाविषयी भावना आणि भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम घेण्यात यावे,सर्वचजण आपणांस सहकार्य करतील,आणि आम्ही देखील असे उपक्रम घेण्यास उत्सुक आहोत असे मत सर्वांनीच मांडले,पुणे शहरात सर्वानी एकत्र येवून समाजसेवा करायला पाहिजे,समाजाच्या मूलभूत प्रश्नाविषयी विचारमंथन व्हायला हवे अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली. उपस्थित महिला भगीनीनी समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त करताना असा सोहळा बघून आम्ही सर्व भारावून गेलो आहोत असे उदगार काढले ….आम्ही देखील भविष्यात आपल्या सोबत राहू आणि यथाशक्ति समाजा प्रति आमचे योगदान देवू असा संकल्प सर्व मान्यवर भगिनींनी केला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजक डॉक्टर अरविंद झेंडे साहेबांच्या संकल्पनेतून साकार झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ समाजसेवक आणि पुणे शहर अध्यक्ष श्री चंद्रशेखर जगताप यानी केले शेवटी कार्यक्रमाचा समारोप करताना सर्वांचे आभार डॉक्टर श्री अरविंद झेंडे साहेबांनी मानले.अशा प्रकारे सदर कार्यक्रम अतिशय आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.भविष्यातही असेच समाज उपयुक्त कार्यक्रम घेण्याचा संकल्प सर्वानुमते करण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




