Home महाराष्ट्र बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने लक्ष्मण पाटील व हेमंत माळी यांचा ग्रंथ...

बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने लक्ष्मण पाटील व हेमंत माळी यांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

53

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी. पाटील सर)

धरणगांव(दि.2ऑक्टोबर):- बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने लक्ष्मण पाटील व हेमंत माळी यांचा अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सन्मान करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष उपक्रमशील शिक्षक मा. लक्ष्मण पाटील सर यांची पत्रकारिता क्षेत्रात लाईव्ह महाराष्ट्र न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. तसेच बामसेफचे जिल्हा महासचिव तथा राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी, आदर्श क्रीडा शिक्षक, उपक्रमशिल आदर्श शिक्षक हेमंत माळी सर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वरील दोन्ही मान्यवरांना अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित व अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी ओबीसी मोर्चा चे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य तसेच बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, बामसेफचे तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील, उपाध्यक्ष किशोर पवार, महासचिव आकाश बिवाल तसेच बहुजन क्रांती मोर्चा चे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleविरंगुळा कक्ष स्थापन करून जेष्ठ नागरिकांचा सन्मान
Next articleसामाजिक बांधिलकी जोपासत साजरा केला वाढ दिवस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here