Home महाराष्ट्र राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदी ,निवृत्त पोलीस अधिकारी राजेन्द्र लोखङे...

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदी ,निवृत्त पोलीस अधिकारी राजेन्द्र लोखङे यांची निवड

91

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.1ऑक्टोबर)-:राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवृत्त पोलिस अधिकारी राजेन्द्र लोखंडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी निवड जाहीर केली.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे काम बघून राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रामाणिक ,निस्वार्थी,निर्भीड नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज विविध क्षेत्रातील युवक महिला उद्योजक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहेत.राजेंद्र लोखंडे पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक या पदावर राहिले असून त्यांचा नाशिक जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असून पक्षवाढीसाठी ते अतोनात प्रयत्न करतील असे बोलतांना लोखङे सांगितले.

आम्ही रिपब्लिकन हे समाज जोडो अभियान संपूर्ण महाराष्ट्रात गतिमान होत असून सर्व समाज घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.निवृत्त पोलिस अधिकारी राजेन्द्र लोखंडे यांना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती केल्यानंतर त्यांना सर्वस्तरातून त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहेत.यावेळी युवा नेतृत्व बिपीन कटारे,नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे,नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल,नरेंद्र जोशी, प्रशांत कटारे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here