Home खेलकुद  राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत यशराजच्या बोलणे महाराष्ट्र संघाला कांस्य

राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत यशराजच्या बोलणे महाराष्ट्र संघाला कांस्य

110

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.1ऑक्टोबर):-ज्योतिबाच्या पायथ्याशी वसलेल्या करवीर नगरीतील सुपुत्र यशराज शशिकांत पोरे याने बडोदा (गुजरात) येथे झालेल्या सामन्यात राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेतील तृतीय क्रमांकासाठी नोंदवलेल्या गोलमुळे महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवता आले.

17 वर्षाखालील मुलांच्या संघात कोल्हापूर जिल्ह्यातून यशराज एकमेव होता. महाराष्ट्र विरुद्ध मध्यप्रदेश यांच्यातील चुरशीचा सामना 2 – 2 असा बरोबरीत होता. अखेरच्या क्षणी यशराज ने आपले कौशल्य दाखवत विजयी गोल नोंदवून संघाच्या विजयासह कांस्यपदक निश्चित केले. यशराज ला त्याचे वडील शहर वाहतूक पोलीस दलात कार्यरत असणारे शशिकांत पोरे, आई शितल पोरे, कोल्हापूर रोलबॉल संघाचे सचिव अमित पाटील, पल्लवी शिंदे, सतीश थोरात आदींचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here