Home महाराष्ट्र कमळवेल्ली गावाची प्रगतीकडे वाटचाल

कमळवेल्ली गावाची प्रगतीकडे वाटचाल

96

✒️प्रतिनिधी झरीजामणी(सुनील शिरपुरे)

झरीजामणी(दि.1ऑक्टोबर):-तालुक्यातील कमळवेल्ली हे गाव पाटणबोरी ते पाटण या मुख्य रोडपासून एक किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या गावाची गावठाण वसलेल्या काळापासून आजपर्यंत मुख्य रोडपासून तर गावात प्रवेश करण्यापर्यंत अजिबात वीज व्यवस्था नव्हती. त्यामुळे रात्रीला बाहेरगावहून येणा-या लाेकांच्या मनामध्ये एक भीती असायची. त्यांना जीव धोक्यात घालून यावं लागत असे किंवा बसस्टाॅपवर कुणालातरी घ्यायला बोलवावं लागत असे.गावाचा विकास करणा-या यंत्रणेत कित्येक सरपंच होऊन गेले.

त्यांच्याकडे बरेचदा गावातील लोकांनी मुख्य रोडपासून गावाच्या प्रवेशापर्यंत वीज व्यवस्थेची मागणी केली होती. परंतु आज पर्यंतच्या सर्व सरपंचांनी करू म्हणत केवळ फुशारक्या मारत लोकांना बनवत आले व निधीवर डल्ला मारत गेले. पण आजपर्यंत एकाही सरपंचानी यासाठी पुढाकार घेऊन ठोस पाऊल उचलले नाही.

आज रोजी कार्यरत महिला सरपंच श्रीमती पुष्पाबाई चुक्कलवार, उपसरपंच वामन हलवेले व समस्त सदस्यगण यांच्या पुढाकाराने ही समस्या प्रत्यक्षात कार्यान्वित करून निकाली काढण्यात आले आहे. अशाप्रकारे प्रकाशमय कार्याचा श्रीगणेशा करून प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या या कार्याला गावातील समस्त जनतेकडून व बाहेरगावच्या लोकांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here